देवर्जन येथे २ लाख ७२ हजार रुपयांचा चंदनाचा गाभा जप्त; एकाविरुध्द गुन्हा..
उदगीर तालुक्यातील देवर्जन येथे स्वतः च्या घरी वृक्षतोड करण्यास प्रतिबंधित असलेल्या व संरक्षीत चंदनाचा तासलेला ओलसर गाभा असलेला माल चोरुन विक्री करणेसाठी स्वता जवळ बाळगलेला मिळुन आला. याप्रकरणी मंगळवारी (२४ सप्टेंबर) उशिरा रात्री उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात एकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि.२४ सप्टेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास देवर्जन येथे आरोपीने आपले स्वत:चे घरात वृक्ष तोड करण्यास प्रतिबंधीत व संरक्षीत चंदनाचा तासलेला ओलसर गाभा असलेला माल चोरुन विक्री करणेसाठी स्वता जवळ बाळगलेला मिळुन आला व पोलीसाची चाहुल लागताच पळुन गेला.
याप्रकरणी पोलीस अधीक्षक लातूर यांनी नेमलेल्या पथकातील ए.टी.बी.चे पोलीस उपनिरीक्षक आयुब गफुरसाब शेख यांच्या फिर्यादीवरुन उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५३१/२०२४ कलम ३०३ भारतीय न्याय संहिता २०२३ तसेच ४१, ४२ भारतीय वन अधीनियम तसेच कलम ४ महाराष्ट वृक्षतोड अधीनियम नुसार रामस्वामी कुसळेकर (फरार ) रा.देवर्जन ता.उदगीर यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील भिसे हे करीत आहेत.
0 Comments