Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

कुमठा येथे १४ वर्षीय मुलांचा खून एका आरोपींला ग्रामीण पोलिसांनी घेतले ताब्यात

कुमठा येथे १४ वर्षीय मुलांचा खून एका आरोपींला पोलिसांनी घेतले ताब्यात

उदगीर:तालुक्यातील कुमठा येथे एका १४ वर्षीय युवकांचा खून झाल्याची घटना १३ जानेवारी रोज शनिवारी १२ वाजता उघडकीस आली आहे.याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून खुनातील एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, संतोष गोविंद घुगे या १४ वर्षीय मुलांचा कोणीतरी खून केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे संतोष गोविंद घुगे हा मुलगा १० जानेवारी रोजी घरातून बेपत्ता झाला होता १३ जानेवारी रोजी कुमठा शेत शिवारात सदरील मुलांचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत मिळून आला.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की संतोष गोविंद घुगे यास अज्ञात कारणासाठी अज्ञात हत्याराने मारून त्याचा खून करून त्याची ओळख पटू नये म्हणून त्याचा चेहरा कशाने तरी विद्रुप करून तसेच त्याचे डोक्याचे केस कापून पुरावा नष्ट केला अशी फिर्याद गोविंद तुकाराम घुगे यांनी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिल्यावरून अज्ञात आरोपींवर गुरंन २८/२०२४ कलम ३०२,२०१ भादवी प्रमाणे १३ जानेवारी रोज शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अरविंद पवार हे करीत आहेत.एक आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Post a Comment

0 Comments

जाहिरात