हकनाकवाडी पाटीवर कंटेनर - दुचाकीच्या धडकेत प्राध्यापकाचा जागीच मृत्यू..
उदगीर - नांदेड राज्य मार्गावर असलेल्या हकनाकवाडी पाटी जवळ (ता.उदगीर) येथे उदगीरहून भरधाव वेगाने नांदेडच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरने दुचाकीस्वारास जोराची धडक देऊन पळून गेला. या अपघातात दुचाकीस्वार प्राध्यापकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (१३ जानेवारी) सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास घडली.
अपघातात मृत्यू झालेल्या प्राध्यापकाचा नाव सचिन रामराव माने (वय ३० वर्षे, रा. अनसारवाडा ता. निलंगा) असे असून ते माऊली काॅलेज ऑफ फार्मसी तोंडार (ता. उदगीर) येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. ते काॅलेजची सेवा बजावून नेहमी प्रमाणे उदगीरकडे आपली दुचाकी क्र. एम.एच.२४ बी.जे.९८५७ या दुचाकीवरून निघाले असता उदगीरकडून भरधाव वेगात येणारा कंटेनर क्र. एच. आर. ६१ डी. ९८४० या कंटेनरने दुचाकीस्वारास जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वाराच्या डोके फुटून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने पडले. अपघातानंतर कंटेनर आहे त्या वेगातच निघून गेला. घटनास्थळी उपस्थित असलेले नागरिक व उदगीर पोलीसांनी माहिती दिल्यावरुन वाढवणा पोलिसांनी भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरला वाढवणा येथे ताब्यात घेतले.


0 Comments