जय जवान चौकात ट्रॅकच्या धडकेत एकाचे दोन्ही पाय निकामी,लातूरला हलवले
उदगीर:शहरातील जय जवान चौक भाजी मार्केटकडे जाणाऱ्या रस्त्याच्या जवळ ट्रकच्या धडकेत एका व्यक्तीचे दोन्ही पाय निकामी झाल्याची घटना १८ फेब्रुवारी रोज रविवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली आहे, सूत्रांनी दिलेली माहिती अशी की उदगीर येथून आंध्रप्रदेशाकडे दाळ घेवून जाणारा ट्रक क्रमांक एपी ०७ टीइ २६९५ या ट्रकच्या धडकेत जय जवान चौक येथे उत्तम बपुना कांबळे वय ६० वर्ष राहणार मांजरी ता उदगीर यांचे दोन्ही पाय अपघातात निकामी झाले आहेत, त्यांना तातडीने उदगीर शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले,येथील डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी लातूर येथे पाठवण्यात आले आहे, ट्रक चालक सुधाक कुप्पुरस्वामी राहणार हुंगल जि. पेकासम राज्य आंध्रप्रदेश हा ट्रकसह शहर पोलीस ठाण्यात हजर झाला आहे.
0 Comments