*इयत्ता बारावी परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या शुभेच्छा*
लातूर दि. 21 : इयत्ता बारावीची परीक्षा बुधवारपासून सुरु झाली. यानिमित्ताने जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दयानंद महाविद्यालय येथील परीक्षा केंद्रावर जावून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. तसेच त्यांना गुलाबपुष्प देवून परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
बारावीची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या आयुष्यतील महत्वाचा टप्पा आहे. या परीक्षेचे कोणतेही टेन्शन न घेता विद्यार्थ्यांनी संयमाने परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी यावेळी केले. तसेच विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
दयानंद महाविद्यालयाच्या नियामक मंडळाचे सदस्य विशाल अग्रवाल, स्मिता अग्रवाल, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, जयमाला गायकवाड, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा केंद्र प्रमुख अनिलकुमार माळी, पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे यावेळी उपस्थित होते.
*****
0 Comments