उदगिरात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला...
उदगीर:शहरातील शेल्हाळ रोडवरील सावरकर नगर येथे रविवारी (१८ फेब्रुवारी) रात्री आठच्या सुमारास अंदाजे ५० वर्षे वयाचा पुरुष जातीचा अनोळखी मृतदेह आढळून आला. याप्रकरणी ग्रामीण पोलीस पोलिसांच्या वतीने मृतदेह ताब्यात घेऊन सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शहरातील सावरकर नगर येथे अनोळखी मृतदेह एका लोखंडी तारेच्या कंपाऊंड शेजारी असल्याची माहिती उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात देण्यात आल्याने ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बंटी कांबळे व पोलीस हेडकाँस्टेबल मोमीन यांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मृतदेहाची ओळख पटविण्याकामी पोलीस प्रयत्न करीत असून रात्री उशिरापर्यंत उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक गुन्हा नोंदची प्रक्रिया सुरू होती.
0 Comments