उदगिरात भांडणाची कुरापत काढून महिलेस दांड्याने मारहाण; चौघांविरुध्द गुन्हा
उदगीर शहरातील बनशेळकी रोडवर मागील भांडणाची कुरापत काढून महिलेस लाकडी दांड्याने डोक्यात मारून गंभीर जखमी केले. याप्रकरणी बुधवारी (२५ सप्टेंबर) उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि.२४ सप्टेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास शहरातील बनशेळकी रोडवरील आरोपीनी संगणमत करुन फिर्यादीस व फिर्यादीचे मुलांना तुमच्यामुळे मक्सुद हा घर सोडुन गेला आहे असे म्हणुन भांडणाची कुरापत काढुन शिवीगाळ करुन लाथाबुक्याने मारहण केली व ईस्माईल वलीयोददीन शेख याने बाजेच्या लाकडी दांडयाने फिर्यादीचे व फिर्यादीचे मुलाचे डोक्यात मारुन जखमी केले व जिवे ठार मारण्याची धमकी दिली आहे.
याप्रकरणी शबाना मक्सुद शेख (रा. क्रांतीनगर बनशेळकी रोड उदगीर ह. मु. एस. टी. कॉंलनी उदगीर) यांच्या फिर्यादीवरुन उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात वलीयोददीन ईस्माईल शेख, अमीना वलीयोददीन शेख, ईस्माईल वलीयोददीन शेख, शबाना ईस्माईल शेख सर्व (रा.क्रांतीनगर बनशेळकी रोड उदगीर) यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हेडकाॅस्टेबल भिसे हे करीत आहेत.
0 Comments