*माझी शक्ती, माझ कुटुंब म्हणजे आपले बुथप्रमुख : क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे*
*उदगीर* : कोरोना महामारीच्या काळात आपण सर्वजण संयमाने काम केले. २०१९ च्या निवडणुकीत आपण सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवुन मला मोठ्या मताधिक्याने निवडून दिले. आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच मी आमदार ते राज्याचा कॅबिनेट मंत्री झालो आणि मागील ५ वर्षाच्या काळात मी उदगीर मतदार संघात विकासाचा डोंगर उभा केला आता आपले उदगीर जळकोट हे विकासाचे मॉडेल म्हणून महाराष्ट्रात नावारूपाला येत आहे. हे केवळ आपल्यामुळेच शक्य झाले. माझी शक्ती, माझ कुटुंब आपण सर्वजण असल्याची भावना क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केली.
ते उदगीर - जळकोट विधानसभा मतदार संघातील सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य, बुथ प्रमुख व प्रमुख पदाधिका-यांच्या संवाद बैठकीत बोलत होते.
यावेळी सिद्धेश्वर पाटील, रामराव राठोड, समीर शेख, प्रवीण भोळे, अर्जुन आगलावे, श्याम डावळे, ब्रम्हाजी केंद्रे, बालाजी भोसले, सय्यद जानीमियाँ, संग्राम हासुळे पाटील, वसंत पाटील, शशिकांत बनसोडे, तात्या पाटील, पाशा शेख, फैजुखाँ पठाण, बाळासाहेब मरलापल्ले, दिपाली औटे, मधुमती कनशेट्टे, काजल मिरजगावे, सुनिल केंद्रे, सत्यवान पाटील, अभिजित औटे, शफी हाशमी, प्रदीप जोंधळे, गिरीश उप्परबावडे, नवनाथ गायकवाड, संगम टाले, धनाजी मुळे, नजीर हाशमी, इम्तियाज शेख, पाशा बेग, शुभम भुमणे, खाजा तांबोळी, प्रभाकर पाटील, दत्ता बामणे, दत्ता पाटील, अरविंद गिलचे, अॅड.वर्षा कांबळे, वैशाली कांबळे, प्रिती कवितकर, आझम पटेल, अझहर मोमीन, इब्राहिम नाना पटेल, ज्ञानेश्वर बिरादार, अविनाश गायकवाड, आदी उपस्थित होते .
पुढे बोलताना ना.संजय बनसोडे यांनी, आपण केलेली लोकहिताची व सामजिक कामे, नागरिकांना उपलब्ध करुन दिलेल्या सर्व सुख सुविधा आदी संदर्भातील कामे शेवटच्या माणसापर्यंत पोहचवा आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमागे मोठी ताकद निर्माण करा कारण आपल्या गावातला व वार्डातलाच बुथ कार्यकर्ता व बुथ प्रमुखच ही
आपली खरी ताकद असुन बूथ प्रमुख व प्रमुख पदाधिका-यांनी आता जोमाने कामाला लागावे असे आवाहन ना.संजय बनसोडे यांनी केले.
येत्या ३० सप्टेंबर रोजी जनसन्मान यात्रा व मतदार संघातील विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या हस्ते होणार असुन या कार्यक्रमास आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही ना.बनसोडे यांनी केले.
यावेळी मतदार संघातील बुथ प्रमुख, पदाधिकारी व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments