Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

क्षेत्रफळ येथे मतदान यंत्राचे प्रात्यक्षिक

क्षेत्रफळ येथे मतदान यंत्राचे प्रात्यक्षिक

उदगीर / प्रतिनिधी
उदगीर तालुक्यातील क्षेत्रफळ येथे मतदान यंत्राचे प्रात्यक्षिक मतदारांना दाखविण्यात आले.
उदगीर मतदार संघातील प्रत्येक गाव, तांडा, वाडी या ठिकाणी उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उदगीरचे तहसीलदार राम बोरगावकर हे गाव , तांडा, वाडी निहाय मतदान यंत्राचे प्रात्यक्षिक दाखवण्यात यावं यासाठी नियोजन करून तसे आदेश काढून प्रत्येक गावात मतदाराला मतदान यंत्राचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येऊन नव मतदाराचे जास्तीत जास्त सहभाग व्हावा मतदाराची टक्केवारी वाढावी यासाठी प्रयत्न करत आहेत. आज उदगीर तालुक्यातील क्षेत्रफळ येथे मतदान यंत्राचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. यावेळी मंडळ अधिकारी पंडित जाधव, तलाठी सावन उळागड्डे, बीएलओ स्वामी सर, मतदान प्रात्यक्षिक दाखवणारे कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी संतोष पांचाळ, सेलूकर सर, शुभम हुसाळे, बजरंग गायकवाड, मनोहर वाघमारे व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

जाहिरात