Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

उदगीर तालुका कोतवाल संघटनेचे क्रीडामंत्री यांना विविध मागण्याचे निवेदन

उदगीर तालुका कोतवाल संघटनेचे क्रीडामंत्री यांना विविध मागण्याचे निवेदन

उदगीर / प्रतिनिधी
राज्य महसूल विभागातील कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी सेवेत सामावून घेण्यात यावे या प्रलंबित मागणीसाठी उदगीर तालुका कोतवाल संघटनेने उदगीर मतदारसंघाचे आमदार तथा क्रीडामंत्री मंत्री संजय बनसोडे यांना तहसील कार्यालय उदगीर येथे मंगळवारी निवेदन देण्यात आले. या निवेदनात महसूल प्रशासनातील विविध लोककल्याणकारी योजना आणि गाव-खेड्यातील जनता यांना समन्वयाचे रूपाने बांधून ठेवणारा घटक म्हणजे कोतवाल आहे. गेली अनेक वर्षे प्रशासनाच्या सेवेत इमान-इतबारे आपली कर्तव्य सेवा हाकणाऱ्या कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून रुजू करून घेणे. ही त्यांच्या शाश्वत भविष्य निर्मितीची नांदी होईल असेही मंत्र्याना दिलेल्या  मागणीमध्ये म्हटले आहे.
यावेळी मुख्यमंत्री व महसूल मंत्री यांना वेळ देऊन राज्य महसूल विभागातील कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी सेवेत सामावून घेण्यासंदर्भात सखोल चर्चा करत लवकरात-लवकर बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन दिले.
या प्रसंगी उदगीर तालुका कोतवाल संघटनेचे अध्यक्षा ज्योती कारलेवाड, उपाध्यक्ष नांदेडकर समाधान, सचिव वानकर उषाताई, सदस्य विठ्ठल चामले, कपिल गोडबोले, उमेश, दयानंद, हरिराम केंद्रे, संतोष जिंकलवाड, राठोड, शेंडगे, भुईंवड, कुंभार, भूताळे, तेलंगे, इत्यादी उपस्थित होत.

Post a Comment

0 Comments

जाहिरात