कर्ज परतफेड करण्यास टाळाटाळ करणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे : उच्च न्यायालय
छत्रपती संभाजीनगर: कर्ज परतफेड करण्यास टाळाटाळ करणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे असा निवाडा मा. उच्च न्यायालयाचे मा. न्या. विभा कणकणवाडी आणि मा. न्या. अभय वाघावसे यांनी दिला आहे.
प्रकरणाची थोडक्यात माहिती अशी की, फिर्यादी नागनाथ हैद्राबादे यांनी चाकूर पो. स्टे. येथे कलम ३०६ भा.द.वि. अंतर्गत गुन्हा दाखल केला. फिर्यादीचा मुलगा प्रशांत याने आरोपी रामराव ढाकणे याना साडे पाच लाख रुपये दिले. सादर पैस्याची मागणी प्रशांत ने केली असता, रामराव यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
सदर आर्थिक व्यवहारातून झालेल्या नुकसानीमुळे प्रशांत ने टेन्शन मध्ये दिनांक ३० मार्च २०२२ रोजी आत्महत्या केली. या आशयाची फिर्याद नोंदवली. पोलीसानी तपासाअंती दोषारोप दाखल केले. सदर एफ आय आर आणि दोषारोप रद्द करण्यासाठी रामराव यांनी ऍड. अजिंक्य रेड्डी यांच्या मार्फत मा. उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ऍड रेड्डी यांनी माणूस हा समाजशील प्राणी आहे त्याला समाजात जगण्यासाठी विविध व्यवहार करावे लागतात, आरोपी ने केवळ पैसे परत देण्यास केलेली टाळाटाळ हि कलम ३०६ च्या तरतुदी मध्ये बसत नाही, फिर्याद व दोषारोप यांचे संपूर्ण अवलोकन केले असता आरोपीने कोणताही गुन्हा केला आहे असे सिद्ध होत नाही या आशयाचा युक्तिवाद केला.
मा. उच्चन्यालयाने कर्ज परतफेड करण्यास नकार दिल्यास अथवा टाळाटाळ केल्यास संबंधित व्यक्ती ला दिवाणी दावा दाखल करून किंवा इतर वैध मार्गाने पैसे वसूल करण्याचा अधिकार आहे परंतु सदर व्यक्तीने आत्महत्येचा मार्ग निवडला असल्यास प्रकरणातील सर्व तथ्य आणि घटना यांचा सारासार विचार केला असता आरोपी चे सदर कृत्य कलम कलम ३०६ च्या तरतुदी मध्ये बसत नाही असे निरीक्षण नोंदवतकर्ज परतफेड करण्यास टाळाटाळ करणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे असा निवाडा मा. उच्च न्यायालयाचे मा. न्या. विभा कणकणवाडी आणि मा. न्या. अभय वाघावसे यांनी दिले आहेत.सदर प्रकरणी ऍड. अजिंक्य रेड्डी यांनी याचिका कर्त्या तर्फे काम पहिले त्यांना ऍड. विष्णू कांदे यांनी सहकार्य केले
0 Comments