Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

उदगीरच्या दोघांचा गाणगापूरच्या नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू परिसरात हळहळ व्यक्त

उदगीरच्या दोघांचा गाणगापूरच्या नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू परिसरात हळहळ व्यक्त

उदगीर:येथील डोईजोडे परिवारातील दोन सख्खे भाऊ गाणगापूर येथे देवदर्शनासाठी गेले असता तेथील नदीत बुडून दोघांचाही करुण अंत झाला. तर त्यांच्यासोबत असलेला एक मित्र या दुर्घटनेत जखमी झाला असून त्याला उपचारासाठी गाणगापूरच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 
मूळचे उदगीरचे रहिवाशी असलेले व सध्या मुंबई स्थित असलेले चित्रपट दिग्दर्शक ऍड.  महेश डोईजोडे हे आपल्या कुटुंबियासह त्यांचे मुंबईतील मित्र कैलास पाटील यांच्या कुटुंबियांना सोबत घेऊन गाणगापूर येथे देवदर्शनासाठी गेले होते. गाणगापूरला जात असताना ऍड. महेश डोईजोडे यांनी उदगीर येथे राहत असलेले आपले बंधू  बालाजी डोईजोडे यांना कुटुंबियांना घेऊन गाणगापूरला येण्यासाठी निरोप दिला. बंधूंच्या निरोपावरून बालाजी डोईजोडे कुटुंबियांना घेऊन गाणगापूरला गेले. तिथे सर्वजण रात्री एका लॉजवर मुक्काम केला. सकाळी उठून नदीवर स्नानासाठी गेले असता ऍड. महेश डोईजोडे व बालाजी डोईजोडे या दोन सख्ख्या भावांचा नदीत बुडून करुण अंत झाला तर त्यांचे मित्र कैलास पाटील यांच्या तोंडात व पोटात पाणी गेल्याने ते गंभीर जखमी झाले असून त्यांना गाणगापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 
डोईजोडे बंधूंच्या प्रेतावर उत्तरीय तपासणी करून त्यांचे प्रेत त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले असून उद्या शुक्रवारी दोन्ही भावांवर उदगीर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
ऍड. महेश डोईजोडे हे मुंबई येथे सिनेक्षेत्रात कार्यरत होते. तर बालाजी डोईजोडे हे उदगीर येथील शेटकार इस्टेटमध्ये बांधण्यात आलेल्या श्री.स्वामी समर्थ मंदिरात सेवा करीत होते. डोईजोडे परिवारावर काळाने घाला घातला असून उदगीर शहरात शोककळा पसरली आहे.

Post a Comment

0 Comments

जाहिरात