Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

अनेक दशकापासून रखडलेला चोंडी तांड्याच्या रस्त्याचा वनवास संपला

अनेक दशकापासून रखडलेला चोंडी तांड्याच्या रस्त्याचा वनवास संपला

उदगीर तालुक्यातील चोंडी तांड्याला रस्ता करून देण्याची नागरिकांची अनेक दशकापासूनची मागणी होती २६ एप्रिल रोजी उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे तहसिलदार राम बोरगावकर साहेब यांनी भर उन्हात रस्त्याची पाहणी करून संबंधीत शेतकऱ्यांना रस्त्याचे महत्त्व पटवून देत रस्ता झाल्यावर शेतकऱ्यांच्या जिवनात चांगले बदल होऊन शेतीचा झपाट्याने विकास होईल असे सांगून चोंडी तांड्याला अनेक दशकापासून रखडलेला  रस्ता मोकळा करून दिल्याबद्दल उपविभागीय अधिकारी,तहसिलदार,सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमराव गायकवाड,मंडळ अधिकारी संतोष चव्हाण,तलाठी राहुल सावरगावे यांचे चोंडी गावातील नागरिक व चोंडी तांड्यातील बंजारा समाजाने आभार मानले, तांड्यातील लहान मुलांना रस्ता नसल्यामुळे आणि गावाजवळ नदी असल्यामुळे पावसाळ्यात मुलांना शाळेपासून वंचित राहावे लागत असे,कोणी आजारी पडल्यावर अथवा एखाद्या वृद्ध व्यक्तीस दवाखान्यात घेऊन जायचे झाल्यास उचलून घेऊन गेल्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता. सदर रस्ता संबंधीत शेतकरी वामन पाटील,बाळू पाटील,संजीव चिटे सावकार यांच्या सहमतीने हा रस्ता खुला करण्यात आल्याने अखेर  चोंडी तांड्याचा वनवास संपला

Post a Comment

0 Comments

जाहिरात