उदगिरात रात्रीच्या अंधारात दबा धरुन बसलेल्या एकास पोलिसांनी घेतले ताब्यात;
उदगीर : प्रतिनिधी
उदगीर शहरातील जिल्हा परिषदेच्या मैदानाच्या शेजारी असलेल्या भींतीजवळ चोरी करण्याच्या उद्देशाने मध्यरात्री दबा धरून बसलेल्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी शुक्रवारी (२५ एप्रिल) पहाटे तीनच्या सुमारास उदगीर शहर पोलीस ठाण्यात कर्नाटक राज्यातील एकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, २५ एप्रिल च्या पहाटे दिडच्या सुमारास आपले अस्तीत्व लपवुन जिल्हा परिषद मैदान शेजारी बाजुस भिंती लगत ओलसावलीत काहीतरी मालाविषयी गुन्हा करण्याच्या इरादयाने दबा धरून बसलेला मिळुन आला.
याप्रकरणी पोलीस कर्मचारी संदीप आण्णराव साठे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दत्तात्रय कुशालराव काळे (रा. गणेशपुर ता औराद (बा) जि बिदर) याचे विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हेडकाँस्टेबल हरणे हे करीत आहेत.
0 Comments