Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

चंदरआण्णा प्रतिष्ठानच्या वतीने उपजिल्हाधिकारी प्रविण मेंगशेट्टी यांचा ऐतिहासिक निरोप समारंभ संपन्न

चंदरआण्णा प्रतिष्ठानच्या वतीने उपजिल्हाधिकारी प्रविण मेंगशेट्टी यांचा ऐतिहासिक निरोप समारंभ संपन्न

उदगीर:सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक उपक्रम राबविण्यासाठी लातूर जिल्ह्यात अग्रस्थानी असलेल्या चंदरआण्णा प्रतिष्ठानच्या वतीने उपजिल्हाधिकारी प्रविण मेंगशेट्टी यांची बदली झाल्याचे औचित्य साधून निरोप समारंभाचा भव्य-दिव्य व ऐतिहासिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे आगळे - वेगळे आयोजन व नियोजन चंदरआण्णा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी केले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष, सहकारमहर्षी चंद्रकांत वैजापूरे तर प्रमुख पाहून म्हणून माजी आमदार गोविंद केंद्रे, तहसीलदार रामेश्वर गोरे, माजी जि.प.सदस्य बस्वराज पाटील कौळखेडकर,खरेदी विक्री संघांचे चेअरमन भरतभाऊ चामले, उदगीर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कदम साहेब, सौ.लक्ष्मी वैजापूरे मॅडम, सौ.कल्पना मेंगशेट्टी मॅडम, सौ.संपदा गोरे मॅडम, सौ.हेरकर मावशी, सौ.कारामुंगे मॅडम, सौ.अमृता वैजापूरे मॅडम, सौ.भोसले मॅडम इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
उदगीर येथे मागील पावणेचार वर्षांपासून उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेले, कोरोनाच्या काळात उदगीर व जळकोट तालुक्यातील जनतेसाठी स्वतःचा जीव मुठीत घेऊन दिवसरात्र कोरोना रुग्णासाठी अतिशय नियोजनबद्ध  व्यवस्थापन करणारे एक अतिशय कर्तव्यदक्ष, दूरदृष्टी असलेले, विकासाची कास धरून सतत कार्यरत असणारे, आपल्या विभागाला पूर्ण वेळ देणारे एक आजाशत्रू प्रशासकीय अधिकारी प्रविण मेंगशेट्टी साहेब यांची पुणे येथे बदली झाल्यामुळे त्यांना चंदरआण्णा प्रतिष्ठानच्या वतीने निरोप देण्यात आला. यावेळी सर्वप्रथम त्यांची सजवलेल्या घोड्यावरून बसवून तुतारीच्या निनादामध्ये, जोरदार फटाके फोडून शेकडो मान्यवरांच्या उपस्थितीत मिरवणूक काढण्यात आली, या मिरवणुकीत त्यांच्यावर भारतीय संस्कृतीप्रमाणे सजलेल्या चिमुकल्या मुलींकडून पूर्णवेळ गुलाबाच्या पाकळ्यांची उधळण करण्यात आली. सुरवातीला मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला व शेवटी चंदरआण्णा वैजापूरे व कार्यक्रमाचे आयोजक श्रीकांत पाटील यांनी सत्कारमुर्ती प्रविण मेंगशेट्टी यांचा भव्य-दिव्य सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यानंतर अनेक मान्यवरांची यथोचित भाषणे झाली शेवटी प्रवीणजी मेंगशेट्टी यांनी सत्काराला उत्तर देताना उदगीरकरांच्या सहकार्यामुळेच मी इथे चार वर्ष चांगले कार्य करू शकलो, उदगीरची संस्कृती ही आदर्श घेण्यासारखी आहे, येथील लोकांनी दिलेले प्रेम, काम करताना केलेले सहकार्य व श्रीकांत पाटील यांनी हा माझा केलेला भव्य-दिव्य सत्कार मी कधीच विसरू शकणार नाही. मी इथून बदली होऊन जरी दूर चालो असलो तरी मनाने मी आपल्यापासून कधीच दूर जाणार नाही असे  भावोद्गगार त्यांनी यावेळी काढले.यावेळी बोलताना त्यांना अनेकवेळा अश्रू अनावर झाले. या कार्यक्रमाचे बहारदार काव्यात्मक सूत्रसंचलन व कार्यक्रमाचे प्रास्ताविक इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसचे संचालक प्रा.सिद्धेश्वर पटणे यांनी केले तर कार्यक्रमाचे संयोजक श्रीकांत पाटील यांनी उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी 
शिवराज मलशेट्टे साहेब, महादेवअण्णा वैजापुरे, शिवसांब पाटील,अमोलजी निडवदे, शिवकुमार सोनटक्के, कैलास पाटील,शिवा पाटील, राजकुमार बिराजदार बामणीकर, सरपंच बालाजी पाटील नेञगावकर, विश्वनाथ बिरादार, कल्याण बिरादार, तानाजी जाधव, विश्वनाथ बिरादार माळेवाडीकर, पञकार व्ही.एस कुलकर्णी, बापुराव नराचे, पत्रकार सुरेश पाटील नेञगावकर, रवी हसरगुंडे, रोडगे सर, शांतवीर मुळे, प्रा.प्रदीप विरकपाळे सर, विजयकुमार चवळे, सय्यद जाॅनीभाई, सुरज वैजापुरे, लक्ष्मीकांत स्वामी, प्रा.स्वामी सर नागलगावकर, प्रा.अख्तार सर, हक्कानी सर, अजय शेटकार, सचिन वाघमारे, अशोक बाहेती, दिलिप माका, सोलापुरे साहेब, अॅड बस्वराज मुळे, अॅड महेश मळगे, अॅड.बस्वराज बिरादार, वैजनाथ बोंडगे, महेश देशमुख, विजय रायवडे, प्रा.शिवशंकर पाटील, प्रा.संजय जामकर सर, प्रा.संतोष चौधरी सर, अशोक काबंळे, दिलिप काबंळे, संगुळगे सर, मुन्ना सुर्यवंशी, सतीष मुळे, आखिलभाई, प्रा.नंदकुमार पटने, केदारनाथ मलशेट्टे, सुनीतजी देशपांडे, अशोक बिरादार,संतोष सुर्यवंशी, ज्ञानेश्वर मोरे, नितीन मुस्कावाड, कोयले सर, ईदलकुंटे सर, श्रावणजी कापसे, रत्नपारके सर,गणेश बिरादार, बाळासाहेब नवाडे, गुणाले साहेब, रमेश खंडोमलके, महेश नवाडे, विजयकुमार सुवर्णकार, कंजे भाऊजी, गिरीधर राजपुरोहित, भास्कर जाधव,सुगावकर सर,मुंडे सर, गुरु धनशेट्टे, शिवशंकर खड्डे, पप्पु डांगे, चेतन परशेन्ने,विलास भंडे, भुसनवाड सर, बालाजी जलमपुरे, किशन कदम, उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

जाहिरात