Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव निमित्य शिव व्याख्याते प्रा. गणेश शिंदे यांचे उदगीर येथे जाहीर व्याख्यान संपन्न

छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव निमित्य शिव व्याख्याते प्रा. गणेश शिंदे यांचे उदगीर येथे जाहीर व्याख्यान संपन्न


उदगीर: 13 मे 2023 या रोजी स्वराज्याचे दुसरे छत्रपती स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे हे हे व्याख्यान देत असताना
 महाराष्ट्रातील युवक नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय उभा करावा भारत देश ही खूप मोठी बाजारपेठ आहे तिचा फायदा करून घ्यावा विदेशी कंपन्या भारतात येऊन मोठा व्यवसाय करतात स्वतःचा व्यवसाय उभा करातात ,आपण का मागे आपणही त्यांच्या सारखे कार्य केले पाहिजे असे सांगितले तसेच छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज हे फक्त ढाल व तलवार हे न पाहता त्यांची दूरदृष्टी, बुद्धीच्यातुर्य निडर बाणा धाडसी वृत्ती व्यापारी दृष्टिकोन आत्मनिर्भरता आधुनिक दृष्टिकोन कसा होता हे सांगितले

 तसेच त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांसारखे चिकित्सक वृत्ती बाळगा असे सांगितले होला हो म्हणू नका ,खरे काय तेच बोला असे त्यांनी सांगितले
 तसेच महिलांचा सन्मान करा महिलांना सुरक्षितता द्या महिला शिकल्या म्हणजे समाज शिकेल महिलांनी  भावी नागरिक घडवण्यासाठी सतत प्रयत्न करणे गरजेचे आहे तेही सांगितले
 तसेच पालकांनी मुलांना मर्यादित विचारवर्ती न ठेवता जागतिक स्तरावरील अभ्यास केला पाहिजे याही बाबी सांगितल्या

 थोडक्यात प्रा. गणेश शिंदे सर यांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी विविध पैलूंचे दर्शन घडविले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते तसेच यावेळी हजारोच्या संख्येने व नवयुवक तरुण युवक सुद्धा उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments

जाहिरात