स्वामी विवेकानंद गणेश मंडळाच्या कार्याध्यक्षपदी कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांची निवड
उदगीर;स्वामी विवेकानंद युवक गणेश मंडळ नाईक चौक देगलुर रोड उदगीर येथे गणेश मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन स्वामी विवेकानंद युवक गणेश मंडळाचे कार्याध्यक्ष करण्यासाठी एकमताने ठराव मंजूर करून कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांची गणेश मंडळाच्या कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
लातूर येथे स्वामी विवेकानंद युवक गणेश मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार संजयभाऊ बनसोडे यांची भेट घेऊन कार्यक्रमाचे निमंत्रण देऊन त्यांचे सत्कार करण्यात आले.
यावेळी संस्थापक अध्यक्ष उदयसिंग ठाकूर, स्वागत अध्यक्ष अजित राठोड, मंडळाचे अध्यक्ष सुशील सांगुळगे सावकार, मंडळाचे संघटक सुनील पाटील,माजी अध्यक्ष राहुल आडे, मा. अध्यक्ष राहुल सातापुरे, खजिनदार शैलेश कोंडेकर, मंडळाचे सदस्य सुनील कारभारी, सतीश चव्हाण उपस्थित होते
0 Comments