Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी दिली दिक्षाभूमीला भेटतथागत गौतमबुद्ध, डॉ. बाबासाहेबांना केले अभिवादन

क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी दिली दिक्षाभूमीला भेट
तथागत गौतमबुद्ध, डॉ. बाबासाहेबांना केले अभिवादन

चंद्रपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेबांनी १६ ऑक्टोबर १९५६ रोजी चंद्रपूर येथे आपल्या अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शामुळे चंद्रपूरची दीक्षाभूमी पावन झाली. त्या पवित्र स्थळाला क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी सोमवारी (ता. २०) भेट देऊन तथागत गौतमबुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पन करुन अभिवादन केले. नतमस्तक झाले.
यावेळी त्यांच्या सोबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, शहर जिल्हाध्यक्ष राजीव क्ककड, महिला शहर जिल्हाध्यक्ष सौ. चारुशीला बारसागडे, विधानसभा अध्यक्ष सुनिल काळे, प्रदेश सचिव आबीद आली,  राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अभिनव देशपांडे, उपाघ्यक्ष राहुल वाघ, जिल्हा सचिव हर्षवंर्धन पीपरे, शहर सचिव संबाजी खेवळे, उपाघ्यक्ष कुमार पॉल, अल्पसंख्यांक शहर जिल्हाध्यक्ष नौशाह शिद्दीकी, नगरसेवक राहुल घेटेकर, कु. हर्षदा पाटील, प्रतीक देशपांडे, सौ. रामटेके ताई, मनोज सोनी, प्रतिक जुमडे आदी उपस्थीत होते.

Post a Comment

0 Comments

जाहिरात