Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

रेल्वे स्टेशन येथे पालित राहणाऱ्या युवकांचा खून,आरोपी पोलिसांच्या ताब्यात,शहर पोलिसांत गुन्हा दाखल

 रेल्वे स्टेशन येथे पालित राहणाऱ्या युवकांचा खून,आरोपी पोलिसांच्या ताब्यात,शहर पोलिसांत गुन्हा दाखल

उदगीर:शहरातील रेल्वे स्टेशन येथे पालित राहणाऱ्या युवकांचा 21 नोव्हेंबर रोजी रात्री 3 वाजता खून झाल्याची घटना घडली आहे,पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की भंगार वेचून उदरनिर्वाह करणारे कुटुंब रेल्वे स्टेशन येथे पालित राहतात 20 नोव्हेंबर रोजी रात्री हे सर्व कुटुंब झोपेत असताना आरोपी रवींद्र भगवान पातोळे,यांनी मयताच्या मावशीचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने अंगावरील साडी व चादर ओढली.महिलेला जाग आल्याने आरडा ओरड केली असता आरोपी पळत जात असताना आरोपीच्या पाठीमागे महिलेच्या नातलगांनी पाठलाग केला यावेळी आरोपीने 20 वर्षीय तरुणाला रेल्वेच्या प्लॉट फार्मवरच्या फरशीवर जोरात आपटले.यात तरुण जागीच ठार झाला मायताची आई नसल्याने तो त्याच्या मावशीकडे राहत होता,अशी तक्रार मायताची मावशी यांनी उदगीर शहर पोलीस ठाण्यात दिल्यावरून आरोपी रवींद्र भगवान पातोळे यांच्यावर गुरंन 321/23 कलम 302,354 भादवी प्रमाणे 21 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप पांडुरंग भागवत यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम हे करीत असून आरोपीं पळून जात असताना ऑटोरिक्षा वाल्यानी आरोपीचा पाठलाग करून पकडला व उदगीर शहर पोलिसांच्या ताब्यात दिले,

Post a Comment

0 Comments

जाहिरात