प्रा शिवाजीराव देवनाळे यांना टोलोसा ( अमेरिका) विद्यापीठाची डॉक्टरेट जाहीर.
उदगीर:महाराष्ट्रातिल प्रसिद्ध विचारवंत, ख्यातनाम वक्ते ,साहित्यिक, फुले,शाहू, आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक वांचित समाज घटकतील लेकरांना शिक्षणाच्या प्रवाहमध्ये आणण्यासाठी काम करणारे कार्यकर्ते म्हणून ख्याती असणारे प्रा शिवाजीराव मरेप्पा देवनाळे यांच्या कार्याची दखल घेऊन अमेरिका येथील टोलोसा विद्यापीठ, मॅक्सीकोनी अत्यंत सन्मानाचा शिक्षण क्षेत्रातील डॉक्टरेट( मानद) पुरस्कार जाहीर केला.
दिनांक 19/11/2023 रोज रविवार या दिवशी बिदर येथील शिवा इंटरनॅशनल हॉटेल मध्ये टोलोसा विद्यापीठाचे ( अमेरिका) इंडिया कंट्री डायरेक्टर डॉ व्ही कट्टाबोमन यांच्या हस्ते विद्यापीठ अवॉर्ड आणि प्रमाणपत्र देऊन प्रा शिवाजीराव देवनाळे यांचा येथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून पशुवैद्यकीय विद्यापीठ बिदरचे प्रा डॉ राजेश पाटील बिजूरकर, कर्नाटक खादी ग्रामुधोग मंडळाचे बिदर जिल्हा प्रमुख राजकुमार पाटील, कर्नाटक अवॉर्ड कोर्डिनेटर रमेश बिगावकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश बिगावकर यांनी केले. तर सूत्रसंचालन मिलिंद कांबळे यांनी केले. या कार्यक्रमात महाराष्ट्र, कर्नाटक,आंध्रप्रदेश, आणि तेलंगणा राज्यातील सन्मानित मान्यवर उपस्थित होते.
0 Comments