उदगीर शहरातील सह दुय्यम निबंधक वर्ग - २ च्या इमारत बांधकामासाठी २ कोटी ६० लक्ष रुपयाचा निधी मंजूर
उदगीर : उदगीर शहर हे तीन राज्याच्या सीमेवर असल्याने या शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून शहरात विविध शैक्षणिक संस्था, विविध शासकीय कार्यालये,
अत्याधुनिक रुग्णालये, बाजारपेठ मोठ्या प्रमाणात असल्याने शहरात राहणाऱ्या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून यामध्ये शहरातील बांधलेली घरे व परिसरातील जमिनींचे खरेदी विक्रीचे व्यवहार करण्यासाठी शहरात असलेल्या सह दुय्यम निबंधक वर्ग - २ च्या कार्यालयात नेहमीच गर्दी असते भाडेतत्त्वावर असलेल्या या कार्यालयात जागा अपुरी पडत असल्याने या भागातील नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन या भागाचे लोकप्रतिनिधी व राज्याचे क्रीडा व युवक कल्याण बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी शासनाकडून उदगीर शहरातील
सह दुय्यम निबंधक वर्ग - २ च्या इमारत बांधकामासाठी २ कोटी ६० लक्ष रुपयाचा निधी मंजूर केला असल्याची माहिती दिली आहे.
उदगीर शहरात खरेदी-विक्रीचे व्यवहार करण्यासाठी नागरिकांना अडचणी येत होत्या. सद्य स्थितीत असलेले कार्यालय हे नांदेड - बिदर रोडवरील उड्डानपुलाजवळ असल्याने नागरिकांना अडचण येत होती. लवकरच सदर इमारत शासकीय जागेत होवून तेथे दर्जेदार इमारतीचे बांधकाम होणार असल्याने नागरकांतुन समाधान व्यक्त होत आहे. सदर इमारत बांधकामासाठी निधी उपलब्ध करुन दिल्याने या भागातील नागरीकांनी ना.संजय बनसोडे यांचे अभिनंदन करुन आभार व्यक्त केले आहेत.
0 Comments