Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

कोरोनाच्या नवीन व्हेरीयंटच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी - जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे*

*कोरोनाच्या नवीन व्हेरीयंटच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी - जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे*

लातूर, दि. 20 देशात काही राज्यांमध्ये कोरोनाचा नवीन व्हेरीयंट आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे. राज्यात अद्याप एकही रुग्ण सापडलेला नसला तरी नागरिकांनी खोकला, गळणारे नाक, शिंका व ताप अशी लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी, असे त्यांनी म्हटले आहे.
ज्यांना सर्दी झाली आहे त्यांनी मास्कचा वापर करावा.  हातावर स्वच्छ पाणी व साबणाने धुवावेत. नाक, चेहरा व डोळ्यांना स्पर्श केल्यानंतर हात साबणाने धुवावेत.  खोकला, गळणारे नाक, शिंका व ताप अशा प्रकारची कोविडची लक्षणे असलेल्या रुग्णांपासून दूर राहावे. न घाबरता खबरदारीचे उपाय करावेत. पौष्टिक आहार घ्या, भरपूर पाणी प्या.  धूम्रपान टाळा, पुरेशी झोप घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments

जाहिरात