Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

तोंडार पाटी येथे झालेल्या अपघात प्रकरणी कार चालकांवर गुन्हा दाखल

तोंडार पाटी येथे झालेल्या अपघात प्रकरणी कार चालकांवर गुन्हा दाखल

उदगीर:तालुक्यातील तोंडार पाटी नांदेड बिदर रोडवर कार व स्कुटीचा अपघात होऊन एक जण जागीच ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना 19 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली होती.याप्रकरणी कार चालकांवर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की इर्टीगा कार क्रमांक एम.एच.24 बी.आर.9161च्या चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन हायगायी व निष्काळजीपणाने चालवून फिर्यादी चालवत असलेली स्कुटी क्रमांक टी.एस.11 ई.एक्स.1580 ला जोराची धडक देऊन फिर्यादीचे चुलत सासरे शेख मुजाहीद सरदारसाब यांच्या मरणास व फिर्यादीस जखमी करण्यास कारणीभूत ठरला.अशी फिर्याद शेख फिरदोस शरफोद्दीन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कार चालकांवर उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरंन 696/23 कलम 304(अ) 279,337,भादवी प्रमाणे 19 डिसेंबर रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल शिरसे हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

जाहिरात