प्रकाश विश्वनाथ पाटील यांचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन,निधनाने देवणी तालुक्यात हळहळ व्यक्त
उदगीर:देवणी तालुक्यातील एका प्रवाशांचा उदगीर बस्थानकात हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे,थोडक्यात माहिती अशी की देवणी तालुक्यातील आनंदवाडी बोळेगावं येथील प्रकाश विश्वनाथ पाटील वय 66 वर्ष हे 13 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6:30 वाजेच्या सुमारास गावाकडे जाण्यासाठी उदगीर बस्थानकात आले होते.बस्थानकातील बाकावर ते बसले असता.अचानकपणे त्यांना झटका आल्याने ते बाकावरून खाली पडले त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.उदगीर आगाराचे वाहतूक नियंत्रक सचिन पटवारी व दैनिक शुभ दिनचे पत्रकार संगम पटवारी यांचे ते भाऊजी आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा, तीन मुली असा परिवार आहे.प्रकाश विश्वनाथ पाटील यांच्या दुःखद निधनाने देवणी तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
0 Comments