विविध विकास कामासाठी नागलगावास 85 लक्ष रुपयांचा निधी मंजूर,सरपंच सुभाष राठोड
प्रतिनिधी/ज्ञानेश्वर पिचारे
उदगीर:तालुक्यातील नागलगाव ग्रामपंचायतीस विविध विकास कामे करण्यासाठी 85 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. नागलगाव ग्रामपंचायतीचे सरपंच सुभाष मुन्ना राठोड,व उपसरपंच नेताजी कांबळे यांनी नागलगावचा विकास करण्यासाठी राज्याचे कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे,व कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्याकडे सतत पाठपुरावा करून विविध विकास कामे मंजूर करून घेतली आहेत.काशीराम व सोमला तांडा येथे सेवालाल भवन व सभागृह बांधकामासाठी 23 लक्ष रुपये,नागलगाव येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरा समोर पूल बांधकामासाठी 10 लक्ष रुपये,बुरुड गल्ली सिमेंट रस्त्यासाठी 10 लक्ष रुपये, मारोती मंदिर ते मागासवर्गीय वस्ती पर्यंत नाली व रस्त्यासाठी 20 लक्ष रुपये, नागोबा नगर सिमेंट रस्त्यासाठी 10 लक्ष रुपये, खासदार फंडातून 7 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.असी माहिती नागलगावचे सरपंच सुभाष मुन्ना राठोड यांनी दिली.यापुढे नागलगावचा विकास करण्यासाठी मंत्र्यांकडे सतत पाठपुरावा करून भरगोस निधी आणून गावाचा विकास करणार असल्याचेही बोलताना सांगितले.
0 Comments