28 रोजी उदगीरात लघुपट महोत्सव व राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण
ह भ प श्री गहिनीनाथ महाराज औसेकर ना. संजय बनसोडे अभिनेत्री प्रेरणा खरात,संचालक दिगंबराराव नेटके यांची उपस्थिती
उदगीर, येथील रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ८वे आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव पञकारिता पुरस्कार वविविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तीचा पुरस्कार वितरण सोहळा रविवार दिनांक 28 जानेवारी 2024 रोजी शिवाजी महावीद्यालय ,उदगीर येथे संपन्न होणार आहे. महोत्सवात सहभागी चित्रपटाचे प्रदर्शन सकाळी 10:30 वाजता पासून तर पुरस्कार वितरण सोहळा दुपारी १:१५ वाजता संपन्न होणार आहे .पुरस्काराचे वितरण ह भ प गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या शुभहस्ते तर महोत्सवाचे उद्घाटन क्रीडा व युवक कल्याण , बंदरे कॅबिनेट मंत्री ना.संजय बनसोडे यांच्या शुभहस्ते होणार आहे यावेळी स्वारातीमचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक दिगंबरराव नेटके, नजर, हक्क ,जवानी जिंदाबाद व ग्लोबल आडगाव चित्रपट फेम अभिनेत्री प्रेरणा खरात ,अजिंठा राजमाता जिजाऊ चित्रपट फेम अभिनेते साहेबराव पाटील उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे तहसीलदार रामेश्वर गोरे तहसीलदार रेणुकादास देवणीकर दिलीप कुमार गायकवाड ,सतिश उस्तुरे, मनोज पुदाले उप विभागीय पोलीस अधिकारी दिलीप भागवत ,नाट्य लेखक अभिनेते प्राध्यापक डॉक्टर सिद्धार्थ तायडे दत्ताभाऊ जवळगे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे .लघुपट महोत्सव व पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी राहण्याचे आवाहन रंगकर्मी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा बिभीषण मद्देवाड सचिव प्रा ज्योती मद्देवाड उपाध्यक्ष मारुती भोसले सिद्धार्थ सूर्यवंशी संदीप मद्दे आदींनी केले आहे
0 Comments