Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

उदगीर व जळकोट येथील एम.आय.डी.सी.च्या कामाला गती द्यावी : क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे*

*उदगीर व जळकोट येथील एम.आय.डी.सी.च्या कामाला गती द्यावी : क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे*

*उदगीर व जळकोट तालुक्याचा एम.आय.डी.सीचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार*

*उदगीर* : उदगीर व जळकोट तालुक्यात उद्योजकांची जमीनीसाठी मोठ्या प्रमाणात मागणी असुन. या दोन्ही ठिकाणी एमआयडीसी निर्मितीसाठीच्या प्रस्तावाला गती द्यावी असे निर्देश क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री तथा परभणीचे पालकमंत्री संजय बनसोडे यांनी दिले.

उदगीर एमआयडीसी साठी जागा अंतीम करण्यात आली असुन सदर प्रस्ताव उच्च स्तरीय समितीकडे पाठविण्यात आला आहे. पुढील आठवड्यात याला मान्यता मिळून कामास गती देता येईल. त्याचबरोबर जळकोट येथे एम आय डी सी साठी जागा एम आय डीसीच्या पथकाने पाहणी केली आहे. याठिकाणी एम आय डीसी पर्यंतचा मुख्य रस्ता जिल्हा प्रशासन करून देईल. या दोन्ही एम आय डीसी ची कामे तातडीने मार्गी लावावित अशा सूचना त्यांनी एम आय डीसी मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मा यांना ना.बनसोडे यांनी बैठकीत केल्या आहेत.

मतदार संघात एम.आय.डी.सी लवकर झाली तर या भागातील उद्योजकांना उद्योग मिळेल व उद्योगाबरोबरच मतदार संघातील बेरोजगार तरूणांना काम मिल्याने शेकडो कुटुंबांचा उदरनिर्वाह भागणार असल्याने या भागातील
एम.आय.डी.सीचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यासाठी ना.संजय बनसोडे हे प्रयत्नशील आहेत.

Post a Comment

0 Comments

जाहिरात