Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

रामनामाचा जप करीत महिलांनी काढली शोभायात्रा

रामनामाचा जप करीत महिलांनी काढली शोभायात्रा

उदगीर : अयोध्या नगरीत प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना निमित्ताने उदगीर येथे विविध महिला मंडळाच्या महिलांनी भव्य शोभायात्रा काढून आंनदोत्सव साजरा केला.
गेल्या अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अयोध्या येथे प्रभू श्रीरामाची मुर्ती प्रतिष्ठापना सोहळा काल पंतप्रधान नरेंद्र मोदी व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या निमित्ताने देशभरात रामभक्तांनी दिवाळी साजरी केली. उदगीर येथेही सर्वत्र उत्साहात हा आंनदोत्सव साजरा करण्यात आला. शहरातील सर्व मंदिरात आरती, भजन महाप्रसाद वाटप असे कार्यक्रम ठेवण्यात आले होते. शहरातील विविध महिला मंडळाच्या महिलांनी एकत्रित येऊन सकाळी नाईक चौकातून भव्य शोभायात्रा काढली. या शोभायात्रा मध्ये शालेय विद्यार्थी राम, सीता, लक्ष्मण व हनुमानाची वेषभूषा घेऊन सहभागी होते. अनेक महिलांनी डोक्यावर कलश घेऊन या शोभायात्रेत सहभाग नोंदविला. यावेळी प्रभू  श्रीरामांचा जयजयकार करीत ही शोभायात्रा नाईक चौकातून कॅप्टन कृष्णकांत चौक ते श्रीराम मंदिरापर्यंत काढण्यात आली. 
या शोभायात्रेत अपर्णा पटवारी, डॉ. दीपाली कुलकर्णी, रसिका माकने, मंगला मध्वरे, शीतल पारसेवार,  डॉ. ज्योती मध्वरे, सीमा  पारसेवार, श्यामला 
महाजन, अर्चना दंताळे, वीणा जळकोटे,सुनीता कोटलवार,मानसी चन्नावर , वंदना जोशी, सुवर्णा पाटील, सुनीता नकुरे, ऐश्वर्या पारसेवार, सायली पारसेवार, पूर्वा जळकोटे, आशा चन्नावर,‌ प्रिया बेद्रे,महिंद्रकर बाई, राधिका जोशी अंबुलगेकर, माधुरी जळकोटे, सुरेखा गुजलवार, यांच्यासह विविध महिला मंडळाच्या महिला सहभागी झाल्या होत्या.

Post a Comment

0 Comments

जाहिरात