बाथरूमच्या पाण्यावरून लोखंडी रॉडने मारहाण,तिघांवर गुन्हा दाखल
उदगीर:शहरातील निडेबन वेस येथे बाथरूमच्या पाण्यावरून २४ जानेवारी रोज बुधवारी लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे, पोलिसांनी दिलेली माहिती अशी की निडेबन वेस येथे फिर्यादी राजेंद्र हणमंतराव काकरे यांनी आरोपीना तुम्ही बाथरूमचे पाणी घरासमोर का सोडले असे विचारणा केली असता,आरोपीने संगनमत करून फिर्यादीस व त्याच्या पत्नीस शिवीगाळ करून लाथाबुक्याने मारहाण करून फिर्यादीच्या कपाळावर लोखंडी रॉडने मारून जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली,अशी फिर्याद राजेंद्र हणमंतराव काकरे यांनी उदगीर शहर पोलीस ठाण्यात दिल्यावरून आरोपी व्यंकट किशनराव काकरे,वैभव व्यंकट काकरे,अनिता व्यंकट काकरे यांच्यावर गुरंन २७/२४ कलम ३२४,३२३,५०४,५०६,३४ भादवी प्रमाणे २४ जानेवारी रोज बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सर्फराज गोलंदाज यांच्याकडे देण्यात आला आहे.
0 Comments