वाढवणा खुर्द युवकांची गळफास घेऊन आत्महत्या,वाढवणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू नोंद
उदगीर:तालुक्यातील वाढवणा खुर्द येथे एका २७ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २४ जानेवारी रोज बुधवारी एक वाजेच्या सुमारास घडली याप्रकरणी वाढवणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की वाढवणा खुर्द शिवारात मयत माधव पंढरी भांगे वय २७ वर्ष राहणार वाढवणा खुर्द हे चिंचाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे,सदरील युवकांस डॉक्टर व्ही.ए.सूर्यवंशी यांनी तपासून मृत घोषित केले, डॉ व्ही.ए.सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीवरून वाढवणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू नंबर ०४/२४ कलम १७४ सीआरपीसी प्रमाणे २४ जानेवारी रोज बुधवारी नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमराव गायकवाड हे करीत आहेत.
0 Comments