Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

रंगकर्मी प्रतिष्ठाण व मराठी पत्रकार संघाचे राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार जाहीर*

*रंगकर्मी प्रतिष्ठाण व मराठी पत्रकार संघाचे राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार जाहीर*

*ज्येष्ठ पत्रकार चंद्रचकोर कारखाने यांना जीवनगौरव*  

*२८ जानेवारीला २०२४ रोजी होणार पुरस्कार वितरण सोहळा*

 उदगीर : मागील ३ वर्षापासुन येथील रंगकर्मी साहित्य, कला, क्रीडा प्रतिष्ठान व मराठी पत्रकार संघाच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आले असुन यामध्ये शोधवार्ता गटामधुन दै.सकाळचे जळकोट प्रतिनिधी विवेक पोतदार यांच्या 'उमेदमुळे शेंद्रीय शेतीला प्रोत्साहन ' या बातमीला प्रथम तर व्दितीय देवणी येथील दै.देशोन्नतीचे तालुका प्रतिनिधी दत्ता पाटील तळेगावकर यांच्या ' शासनाने देवणी जातीच्या वळुला केलं हद्दपार ' आणि तृतीय उदगीर येथील दै.सकाळचे प्रतिनिधी संतोष जोशी यांच्या ' व्यवसायाकरिता कुठल्याही धर्माच्या व्यक्तीला मिळू शकते जातीचे प्रमाणपत्र' या बातमीस जाहीर झाला असुन उत्कृष्ट वार्ता गटात
लातूर येथील दै.सोलापुर तरुण भारतचे प्रतिनिधी वामन पाठक यांच्या 'जलसाक्षरता रॅली की, मतदार जोडी अभियान' तर व्दितीय चाकूर येथील दै.देशोन्नतीचे प्रतिनिधी विकास स्वामी यांच्या 'डोंबारी समाजातील महिलेला पंचायत समितीचा ध्वज फडकविण्याचा मिळाला मान' तर तृतीय अहमदपुर येथील दै.देशोन्नतीचे प्रतिनिधी बाशिदखान पठाण यांच्या ' तोटा पंधराला घेता मग फडा ७० रूपयांना का नाही? ' या बातमीस तृतीय पुरस्कार जाहीर करण्यात आला असुन रंगकर्मी व मराठी पत्रकार संघाच्या वतीने उत्कृष्ट वार्ता व शोध वार्ता या दोन्ही गटासाठी रोख रक्कम व सन्मानचिन्ह देवून दि.२८ जानेवारी २०२४ रोजी दुपारी १:१५ वाजता, उदगीर शहरातील  शिवाजी महाविद्यालयात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
कै.गौतम संभाजीराव सुर्यवंशी यांच्या स्मरनार्थ संघाचे सचिव सिध्दार्थ संभाजीराव सुर्यवंशी यांच्या वतीने रोख रक्कम व गौरवपत्र तर व्दितीय पारितोषिक २००१/-   प्रकट वीर हनुमान  मंदीर कौळखेड , सुधाकर नाईक यांच्या वतीने रोख रक्कम व गौरवपत्र तर तृतीय पारितोषिक  मराठी पञकार संघ व रंगकर्मी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. बिभीषण मद्देवाड यांच्या वतीने रोख १००१/- रु व गौरवपत्र देण्यात येणार आहे तर दुस-या गटातील उत्कृष्ट वार्ता गटात प्रथम पारितोषिक  ३००१ ₹ चे कै.व्यंकटराव सगर यांच्या स्मरनार्थ संघाचे उपाध्यक्ष  प्रा.भगिरथ सगर यांच्या वतीने रोख रक्कम व गौरव चिन्ह  तर व्दितीय पारितोषीक प्रा. बंकट कांबळे उदयगीरी महाविद्यालय उदगीर यांच्या वतीने   २००१ ₹ रोख रक्कम व गौरवपत्र तर रंगकर्मी प्रतिष्ठान व मराठी पञकार संघाचे अध्यक्ष  प्रा . बिभीषण मद्देवाड यांच्या वतीने तृतीय पारितोषीक १००१ रूपये रोख रक्कम व गौरवपत्र देण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन
 रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठान व मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. बिभीषण  मद्देवाड , सचिव सिद्धार्थ सूर्यवंशी, उपाध्यक्ष प्रा.भगिरथ सगर, बस्वेश्वर डावळे,सहसचिव सुधाकर नाईक, कोषाध्यक्ष बबन कांबळे, सदस्य नागनाथ गुट्टे, मनोहर लोहारे, संग्राम पवार, अझरोद्दीन शेख, शंकर बोईनवाड, अरविंद पत्की, अंबादास अलमखाने, अशोक तोंडारे यांच्यासह अँड.विष्णु लांडगे, अँड. महेश मळगे,  प्रा.रामदास केदार, रसुल पठाण, लक्ष्मण बेंबडे, संदीप मद्दे, मारोती भोसले, भरतकुमार गायकवाड, अविनाश सुर्यवंशी, बालाजी कसबे,  यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments

जाहिरात