Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

राज्य कुटुंब कल्याण आरोग्य सेवा उपसंचालकांनी घेतला लातूर परिमंडळातील आरोग्य विषयक कामकाजाचा आढावा*

*राज्य कुटुंब कल्याण आरोग्य सेवा उपसंचालकांनी घेतला लातूर परिमंडळातील आरोग्य विषयक कामकाजाचा आढावा*

लातूर, दि. 29  : लातूर परिमंडळातील जिल्हा व महानगरपालिका कार्यक्षेत्रातील लातूर, धाराशिव, बीड व नांदेड जिल्ह्याच्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची विभागीय आढावा बैठक राज्य कुटुंब कल्याण कार्यालयातील उपसंचालक डॉ. रेखा गायकवाड यांच्या उपस्थितीत लातूर आरोग्य सेवा उपसंचालक कार्यालयात नुकतीच झाली. यावेळी त्यांनी परिमंडळातील आरोग्य विषयक सेवा आणि कामकाजाचा आढावा घेतला. 

लातूरच्या आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. अर्चना भोसले-किर्दक, सहायक संचालक डॉ. प्रीती बादाडे, सहायक संचालक डॉ. संजय ढगे, परिमंडळातील सर्व जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, लातूर महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी, जिल्हा क्षयरोग अधिकारी, आरसीएच, निवासी वैद्यकीय अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक यावेळी उपस्थित होते.

श्रीमती डॉ. गायकवाड यांनी परिमंडळातील जिल्हा व महानगरपालिका कार्यक्षेत्राचा आढावा घेतला व मार्गदर्शन केले. तसेच जिल्हानिहाय आरोग्याच्या विविध कार्यक्रमाचा योजनांचा आढावा घेतला. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत उपलब्ध अनुदान मार्च अखेरपर्यंत खर्च करण्याचे निर्देश दिले.

श्रीमती डॉ. भोसले-किर्दक यांनी आयुष्यमान भव, विकसित भारत संकल्प यात्रा, कोविड-19, सिकलसेल, आरोग्य मंदिर व बांधकाम आदी विषयांचा आढावा घेतला. सहायक संचालक श्रीमती डॉ. बादाडे यांनी आपला दवाखाना, ई-औषधी, औषधी भांडार आदी विषयांचा आढावा घेतला. सहायक संचालक डॉ. ढगे यांनी मलेरिया, डेंग्यू व हत्तीरोग आदी विषयांचा आढावा घेतला व मार्गदर्शन केले.
******

Post a Comment

0 Comments

जाहिरात