उपविभागीय पोलीस अधिकारी दिलिप भागवत व पोलीस निरीक्षक परमेश्वर यांनी केला क्रीडा मंडळाचा सन्मान
उदगीर:जिल्हा परिषदेच्या मैदानावर नामदार संजय बनसोडे क्रीडा मंडळाच्या वतीने राज्यस्तरीय मिनिस्टर ट्रॉफी अखिल भारतीय डे नाईट फुटबॉल स्पर्धेचे आयोजन १४ जानेवारी ते २० जानेवारी दरम्यान करण्यात आले होते.फुटबॉल स्पर्धेच्या ठिकाणी क्रीडा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी यशस्वीरीत्या नियोजन करून स्पर्धा पार पाडल्याबद्दल उदगीर शहर पोलीस स्टेशन येथे उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप भागवत व उदगीर शहर पोलिस ठण्याचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांच्या वतीने २९ जानेवारी रोज सोमवारी संध्याकाळी सर्व मंडळाच्या सदस्यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी माजी नगरसेवक अहमद सरवर यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments