Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

तीस तोळे सोने व दहा लाखासाठी विवाहितेचा छळ,चार लोकांवर गुन्हा दाखल

तीस तोळे सोने व दहा लाखासाठी विवाहितेचा छळ,चार लोकांवर गुन्हा दाखल

उदगीर:तीस तोळे सोने व दहा लाख रुपये माहेरहून घेऊन ये म्हणून विहातेचा छळ केल्याप्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात सासरच्या चार लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की प्रेरणा रोहित वडमारे वय २४ वर्ष राहणार ५०२ मुक्ता अपार्टमेंट मिल्ट्री रोड अंधेरी ईस्ट मुंबई ह.मू.नई अबादी उदगीर या  विवाहितेला तुझ्या वडिलांचा लग्नामध्ये जास्ती खर्च झाला नाही,तुझ्या वडिलांचे पैसे वाचले आहेत तर तू वडिलांकडून रोहितला कंपनी टाकून देण्यासाठी तीस तोळे सोने व दहा लाख रुपये घेवून ये म्हणून संगनमत करून चारीत्र्यावर संशय घेऊन उपाशी पोटी ठेवून शारीरिक व मानसिक छळ करून शिवीगाळ करून लथाबुक्याने मारहाण केली,व जीवे मारण्याची धमकी दिली.अशी फिर्याद प्रेरणा रोहित वडमारे यांनी उदगीर शहर पोलीस ठाण्यात दिल्यावरून  आरोपी रोहित देवराम वडमारे, देवराम दगडू वडमारे,वनिता देवराम वडमारे,सर्व राहणार अंधेरी वेस्ट मुंबई यांच्यावर गुरंन ४३/२४ कलम ४९८(अ) ३२३,५०४,५०६,३४ भादवी प्रमाणे ७ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल शेख हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

जाहिरात