Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

शंकर उच्च माध्यमिक आश्रम शाळेचे एच एस सी बोर्ड परीक्षा 2024 मध्ये घवघवीत यश

शंकर उच्च माध्यमिक आश्रम शाळेचे एच एस सी बोर्ड परीक्षा 2024 मध्ये घवघवीत यश
 
उदगीर:-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या   फेब्रुवारी /मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या एच एस सी बोर्ड परीक्षेत आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी उज्वल यशाची परंपरा कायम राखत शाळेचा यावर्षीचा निकाल 98.24% इतका  लागला आहे.  विज्ञान विभागाचा निकाल 98.62%  लागला असून या विभागातून  चैनपुरे सुप्रिया गणेश 81.00 % घेऊन प्रथम आली आहे तर बिरादार आकांक्षा बालाजी 80.83% घेऊन द्वितीय तर पाटील ऋतुजा गोविंद 80.33%व नाईक निकिता सुधाकर 80.17℅ टक्के घेऊन तृतीय आली आहे. तर कला विभागाचा निकाल 97.59% लागला असून मुंडे प्रतीक्षा सूर्यकांत 79.67%  प्रथम,  बिरादार प्रतीक्षा त्र्यंबक 77.83% घेऊन व्दितीय तर  राठोड अर्जुन शिवाजी 76.83% घेऊन तृतीय आला आहे. यासह विशेष प्राविण्यासह 37 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तर प्रथम श्रेणीत 136 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सर्व गुणवंत  उत्तीर्ण  विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष  बापूसाहेब राठोड,  सचिव  अमित राठोड, आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका शेरे त्रिवेणी , उपमुख्याध्यापक स्वामी एस. जी. पर्यवेक्षक पाटील वाय. एस.,  केंद्र संचालक बिरादार बी. जी.  व सर्व शिक्षकांनी अभिनंदन करून  पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments

जाहिरात