बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे बुध्द जयंती साजरी
उदगीर येथील महार हडोळा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे दि. २३ मे रोजी महामानव तथागत गौतम बुद्ध यांची जयंती साजरी करण्यात आली.
देगलूर रोडवरील नियोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमेचे व तथागत गौतम बुद्धांची प्रतिमेचे पूजन महेंद्र सूर्यवंशी, उत्तम पकोळे, गौतम कांबळे, महेश गंडारे, शिवाजी पकोळे, विठ्ठल कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी परिसरातील बौध्द बांधव उपस्थित होते. उपस्थित बांधवांनी पुष्प वाहून अभिवादन केले. यावेळी पंचशील ध्वजावरण राजकुमार पकोळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्रिशरण- पंचशील घेऊन बौद्ध जयंती साजरी करण्यात आली. गौतम कांबळे, महेंद्र सूर्यवंशी, उत्तम पकोळे, बाबासाहेब सूर्यवंशी, राजकुमार पकोळे, महेश गंडारे, शिवाजी पकोळे, मुकेश गायकवाड, प्रेम गायकवाड, सचिन पकोळे, संतोष जाधव, प्रकाश जाधव, श्रीकांत लोकरे, स्वप्निल पकोळे, मुकेश गायकवाड, आदींची उपस्थिती होती.
0 Comments