सोयरिकसाठी बोलावून घेऊन महिलेची व मुलीची केली सेंट्रिंगच्या बांबूने धुलाई..
उदगीर : प्रतिनिधी
उदगीर तालुक्यातील करडखेल येथील चौघांनी सोयरिकी संदर्भात चर्चा करायची म्हणून देवणी तालुक्यातील वलांडी येथे बोलावून घेऊन महिलेसह मुलीला सेंट्रिंगच्या बांबूने धुलाई करीत गंभीर जखमी केले. याप्रकरणी गुरुवारी (२३ मे) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास देवणी पोलीस ठाण्यात करडखेल (ता.उदगीर) येथील चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि.१८ एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आरोपीनी संगणमत करुन फिर्यादीस सोयरिकी बाबत चर्चा करण्यासाठी वलांडी येथे बोलावुन घेवुन हातातील सेंट्रींगच्या बांबुने फिर्यादीच्या दोन्ही पायाचे मांडीवर व डोकीत मारून जखमी केले व फिर्यादीचे मुलीस हातातील सेंट्रींगचे बांबुन डावे पायाचे मांडीवर मारुन जखमी केले व आणि फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्याने मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी सकुबाई पुंडलिक कदम (रा. वंजारवाडा (शि.) ता. निलंगा) यांच्या फिर्यादीवरून देवणी पोलीस ठाण्यात कालिदास गायकवाड, इंदूबाई कालिदास गायकवाड, श्याम राजाराम कांबळे, अरविंद राजाराम कांबळे (रा करडखेल ता उदगीर) यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हेडकाँस्टेबल लामतुरे हे करीत आहेत.
0 Comments