Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

सुमठाणा येथे दुचाकीस्वाराचा रस्ता अडवून लोखंडी राॅडने जबर मारहाण; चौघांविरुध्द गुन्हा दाखल...

सुमठाणा येथे दुचाकीस्वाराचा रस्ता अडवून लोखंडी राॅडने जबर मारहाण; चौघांविरुध्द गुन्हा दाखल...

उदगीर : प्रतिनिधी
उदगीर तालुक्यातील सुमठाणा  येथे एकाला रस्ता अडवून लोखंडी राॅडने मारुन गंभीर जखमी केले. याप्रकरणी गुरुवारी ९ मे रोजी वाढवणा पोलीस ठाण्यात चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि.२५ एप्रिल रोजी रात्री सातच्या सुमारास आरोपीनी संगणमत करुन यातील फिर्यादी हा त्याच्या मोटारसायकलवर बसून घराकडे रोडने जात असताना प्लाॅटच्या देणे घेणेच्या कारणावरुन फिर्यादीच्या गाडीसमोर लाकुड टाकुन रस्ता आडवुन त्याचे हातातील लोखंडी राॅडने फिर्यादीच्या डोक्यात उजवे कानाच्या पाठीमागे मारुन जबर दुखापत करुन बेशुध्द केले व फिर्यादी खाली पडल्यानंतर त्याच्या हातातील लाकडी काठीने फिर्यादीच्या दोन्ही पायावर मारुन जखमी केले व फिर्यादीस लाथाबुकायाने मारहाण करुन तु जर पुन्हा प्लाट मागीतलास तर आम्ही बघतो अशी जिवे मारण्याची धमकी.दिली
याप्रकरणी भानुदास देविदास कबनुरे (वय ३२ वर्षे रा. सुमठाणा, ता. उदगीर) यांच्या फिर्यादीवरून वाढवणा  पोलीस ठाण्यात गु.र.नं.१३९/२०२४ कलम ३२६, ३४१, ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ भादविनुसार नामदेव विनायक बिरादार,विनायक मारोती बिरादार, धनश्री नामदेव बिरादार, चंद्रकला विनायक बिरादार (सर्व रा. सुमठाणा ता. उदगीर) यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हेडकाँस्टेबल सोनवणे हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

जाहिरात