Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे काम उत्कृष्ट दर्जाचे करून अनावरण करा

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे काम उत्कृष्ट दर्जाचे करून अनावरण करा

 १ जुलै रोजी होणाऱ्या पुतळा अनावरणाला बंजारा समाजाने दर्शविला विरोध

उदगीर:शहरातील देगलूर रोड नाईक चौक येथे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे काम सुरू असून या पुतळ्याचे काम निकृष्ठ दर्जाचा होत असून १ जुलै रोजी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण विविध मान्यवरांच्या हस्ते होणार असले तरी बंजारा समाजाने संताप व्यक्त केला, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याच्या अनावरण होण्यापूर्वीच बंजारा समाजाने पुतळा उद्घाटनाला विरोध दर्शविला आहे,पुतळ्याच्या भोवती बसवलेल्या फरश्याना भेगा पडल्या असून गुत्तेदाराने काम मात्र निकृष्ट दर्जाचे केले आहे,पुतळ्याच्या अवतीभोवती पाण्याचे कारंजे,बसवावे पुतळ्याचे काम पूर्णपणे उत्कृष्ट दर्जाचे करून घाईगडबडीने १ जुलै रोजी पुतळ्याचे उद्घाटन न करता ऑगस्ट मध्ये करण्यात यावा अशी मागणी बंजारा समाजाने केली आहे,यावेळी माजी सभापती प्रकाश राठोड, माजी सरपंच संजय पवार,मनसे जिल्हा अध्यक्ष संजय राठोड, श्रीधर राठोड, सिंघम जाधव, संजय नाईक,नितीन राठोड, अमोल चव्हाण,आदीसह उदगीर तालुक्यातील तमाम बंजारा बांधवांनी १ जुलै रोजी होणाऱ्या माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याच्या उद्घाटनास विरोध दर्शविला आहे.

Post a Comment

0 Comments

जाहिरात