Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

हंडरगुळी येथील विवाहितेचा २ लाख रुपयांसाठी छळ...

हंडरगुळी येथील विवाहितेचा २ लाख रुपयांसाठी छळ...

वाढवणा (बु) पोलीस ठाण्यात सासरच्या ९ जणांविरुद्ध गुन्हा..

उदगीर : प्रतिनिधी

     उदगीर तालुक्यातील हंडरगुळी येथील विवाहितेचा सासरच्या मंडळीने २ लाख रुपये माहेरहून घेऊन ये म्हणून मानसिक शारीरिक छळ केले. याप्रकरणी सोमवारी (२४ जून) रात्री वाढवणा (बु) पोलीस ठाण्यात सासरच्या ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     याबाबत अधिक माहिती अशी की, दि.९ मार्च २०२३ ते २ मे २०२४ पर्यंत कुरुळा (ता.कंधार जि.नांदेड) सासरच्या मंडळीने संगनमत करुन विवाहितेस माहेरहून दोन लाख रुपाये घेवुन ये म्हणून सतत मानसीक व शरीरीक छळ करुन शिवीगाळ करुन लाथाबुक्याने मारुन जिवे मारणची धमकी दिली.

     याप्रकरणी वर्षा केशव वन्नलवाड (वय २२ वर्ष, रा. कुरुळा ता. कंधार ह. मु. हंडरगुळीता. उदगीर) यांच्या फिर्यादीवरुन वाढवणा (बु) पोलीस ठाण्यात गु.र.नं.१६७/२०२४ कलम ४९८ (अ), ३२३, ५०४, ५०६, ३४ भादवी नुसार केशव गोपाळ वन्नलवाड, गयाबाई गोपाळ वन्नलवाड, गोपाळ रामा वन्नलवाड,  माधव गोपाळ वन्नलवाड, ज्योती माधव वन्नलवाड, जनाबाइ शिवाजी पंदीलवाड, शिवाजी पंदीलवाड,विठठल मारोती वन्नलवाड, सुनिता वन्नलवाड (सर्व रा. कुरुळा ता.  कंधार जि. नांदेड) यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हेडकाँस्टेबल बळदे हे करीत आहे.

Post a Comment

0 Comments

जाहिरात