Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

डिग्रस जवळ पुलाच्या कठड्याला कार आदळून २ ठार तर १ गंभीर..

डिग्रस जवळ पुलाच्या कठड्याला कार आदळून २ ठार तर १ गंभीर..

चालक फरार, उदगीर - लातूर राज्य मार्गावरील घटना...

उदगीर : प्रतिनिधी
 लातूर - उदगीर राज्य मार्गावरील डिग्रस जवळील पुलाच्या कठड्याला आदळून या भिषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू तर एकजन गंभीर जखमी. ही घटना गुरुवारी (२७ जून) सकाळी आठच्या सुमारास घडली. 

     याबाबत अधिक माहिती अशी की, दि.२४ जून रोजी फिर्यादीची आई ही आपल्या मुकबधीर मुलालास व सोबत मुलीला घेऊन भाड्याच्या कारने उदगीर येथून छत्रपती संभाजी नगर येथे उपचारासाठी घेऊन गेली होती. मुकबधीर मुलाच्या उपचारानंतर दि.२६ जून रोजी रुग्णालयातून रात्री डिसचार्ज मिळाल्यावर पठाण कुटुंबातीय कार क्र.एम.एच.१२ वाय.ए. ५४२६ या कारने उदगीरला निघाले होते. गुरुवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास कार चालकाच्या निष्काळजीपणामुळे लातूर - उदगीर राज्य मार्गावरील डिग्रस पाटी जवळील पुलाच्या कठड्याला जोराची धडक बसल्याने या भिषण अपघातात आई नामे शब्बीरबी हबीबखाँ पठाण (वय ५५ वर्षे), व तीचा मुकबधीर मुलगा नामे जफर हबीबखाँ पठाण (वय २५ वर्षे, दोघेही रा. गोविंद नगर नांदेड नाका उदगीर ता. उदगीर) यांचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघात मुलगी शाहीन हबीबखाँ पठान (वय ३५ वर्षे रा गोविंद नगर नांदेड नाका उदगीर ता. उदगीर) ही गंभीरपणे जखमी झाल्याने लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दोन्ही मृतदेहाची उत्तरीय तपासणी उदगीर तालुक्यातील हेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आली. व दोन्ही मयताचा दफनविधी मुळ गावी वाढवणा (बु) येथे गुरुवारी सायंकाळी शोकाकुल वातावरणात करण्यात आले.

अशी फिर्याद मयताचा मुलगा आसिफ हबीबखाँ पठान (रा.गोविंदनगर नांदेड रोड उदगीर) यांच्या फिर्यादीवरुन उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं.३६४/२०२४ कलम ३०४, ८, २७९, ३३७, ३३८, भादवी १८४, १३४,१७७ मोटार वाहन कायद्यानुसार कार चालक नौमान कुरेशी नुरुलहक कुरेशी (रा. शकील चोक उदगीर ता. उदगीर) याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक तारु हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

जाहिरात