Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

उदगीर तालुक्यात 28 ते 30 जुलै दरम्यान ड्रोन वापरास बंदी

उदगीर तालुक्यात 28 ते 30 जुलै दरम्यान ड्रोन वापरास बंदी

लातूर, दि. 26 :  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुका हद्दीत 28 जुलै 2024 रोजीचे 00.01 पासून 30 जुलै 2024 रोजीचे 24.00 या कालावधीत ड्रोनचे विना परवाना व बेकायदेशीर ड्रोन प्रक्षेपण आणि ड्रोनचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत.

*****

Post a Comment

0 Comments

जाहिरात