Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

उदगीर,जळकोट बंजारा समाजाची बैठक संपन्न,समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी लढा उभारणार, बैठकीत निर्णय

उदगीर,जळकोट बंजारा समाजाची बैठक संपन्न,समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी लढा उभारणार, बैठकीत निर्णय

उदगीर: उदगीर व जळकोट तालुक्यातील बंजारा बांधवांची बैठक हावगीस्वामी महाविद्यालय उदगीर येथे संपन्न झाली. या बैठकीत समाजातील विविध समस्या बाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीत बंजारा समाज हा भटक्या विमुक्त या प्रवर्गात येतो परंतु या प्रवर्गात अनेक जाती जमातीने घुसखोरी करून भटक्या विमुक्तांचे आरक्षण संपवत आहेत. त्याला चाप लावण्यासाठी ही घुसकुरीत थांबवण्यासाठी प्रयत्न करण्याचा सर्वांनुमते ठरले. त्याचबरोबर बंजारा समाज हा अनादी काळापासून डोंगरदऱ्यामध्ये वास्तव्य करून आहे.खऱ्या अर्थाने अनुसूचित जमाती या प्रवर्गामध्ये हा समाज मोडतो. शेजारील आंध्र प्रदेश राज्यांमध्ये बंजारा समाज हा अनुसूचित जमातीमध्ये आहे. तर कर्नाटक मध्ये अनुसूचित जाती या प्रवर्गात येतो. त्यामुळे येथील रोटी बेटी व्यवहार असलेल्या बंजारा समाजाला विविध सोयी सुविधा मिळतात. परंतु त्याच समाजाला महाराष्ट्रामध्ये भटक्या विमुक्त या प्रवर्गात केवळ तीन टक्के आरक्षण मिळते. आणि त्यात जवळपास 14 जातींचा समावेश आहे अलीकडच्या काळात अनेकांनी घुसखोरी करून हे आरक्षण संपण्याच्या मार्गावर आहे.
    तसेच भटक्या विमुक्त समाजातील शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, व्यवसायिक या अनेक समस्यावर चर्चा करण्यात आली आणि एक मुखाने बंजारा बांधव ह्या समस्या सोडवण्यासाठी एकत्र येऊन मोठ्या स्वरूपात लढा उभा करण्याचे सर्वानुमते ठरले.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मा.बापूराव राठोड हे होते तसेच समस्त जिल्ह्यातून उपस्थित असलेले सुरेश चव्हाण , संजय राठोड,अशोक चव्हाण रविकांत चव्हाण, संतोष पवार, प्रकाश राठोड, नागेश पवार ,गणपती दादा राठोड, सुरेश राठोड, दगडू जाधव तसेच उदगीर तालुक्यातून सामाजिक, शैक्षणिक, राजकीय सर्व क्षेत्रातील विविध मान्यवर व तरुण बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

जाहिरात