*राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूच्या हस्ते उदगीरच्या बौद्धविहाराचे लोकार्पण*
*उदगीरसाठी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांचा खास वेळ*
*क्रीडामंत्री संजय बनसोडे यांची माहिती ३० जुलै रोजी आयोजन*
*उदगीर* : उदगीर येथील नव्याने उभारण्यात आलेल्या बौद्ध विहार व अन्य विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यासाठी महामहिम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना उदगीरचे आमदार तथा राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी काही दिवसांपूर्वीच दिल्ली येथे भेट घेवुन निमंत्रण दिले होते. त्यानुसार येत्या ३० जुलै रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा उदगीर दौरा निश्चित झालेला आहे. या अनुषंगाने प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात येत आहे. तर उदगीरकरांच्या वतीने राष्ट्रपतींचे जोरदार स्वागत करण्यात येणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे उदगीर येथे आयोजीत पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बुध्द वंदना होणार असुन पूज्य भन्ते उपस्थित राहणार आहेत त्यानंतर महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या मैदानावर मान्यवरांच्या उपस्थितीत सभा व मार्गदर्शन होणार आहे. यासाठी महामहिम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांचा खास वेळ असुन यावेळी राज्यापाल रमेशजी बैस, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, लातूरचे पालकमंत्री गिरीश महाजन व जिल्ह्यातील सर्व आमदार व सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी दिलेले निमंत्रण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारले आहे. तर राष्ट्रपतींचा प्राथमिक दौरा प्रशासनाकडे आलेला आहे. त्यानुसार ३० जुलै रोजी
सकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या नांदेड विमानतळावर येणार आहेत. तेथून हेलिकॉप्टरद्वारे सकाळी ११.४५ वाजताच्या सुमारास उदगिरात दाखल होणार आहेत. उदगीर शहरातील नव्याने उभारण्यात आलेल्या भव्य दिव्य अशा बौद्ध विहाराचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयावर त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रपतींच्या दौऱ्यानिमित्त प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आली असून, या दौऱ्याच्य पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी उदगिरात येऊन हेलीपॅड व अन्य तयारीच्या अनुषंगाने पाहणी केली आहे.
यावेळी माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, माजी आ.गोविंदराव केंद्रे,भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, बस्वराज बागबंदे, माजी सभापती सिद्धेश्वर पाटील, भगवानराव पाटील, भरत चामले, भरत चामे, बालाजी भोसले पाटील, सय्यद जानीमियाँ, वसंत पाटील, सुधीर भोसले, शिवशंकर धुप्पे, मनोज पुदाले, उत्तरा कलबुर्गे, विठ्ठल चव्हाण, शफी हाशमी, अभिजित औटे, प्रदीप जोंधळे, विनायकराव बेंबडे, बसवराज रोडगे, विनायकराव बेंबडे, हणमंतराव हंडरगुळे, गिरीश उप्परबावडे, नजीर हाशमी, व्यंकट नेत्रगावकर, आदी उपस्थित होते.
यावेळी उदगीर व जळकोट तालुक्यातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी केले आहे.
0 Comments