चोंडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत रक्षाबंधन कार्यक्रम साजरा
उदगीर तालुक्यातील चोंडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत रक्षा बंधनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.शाळेतील शिक्षिका व शालेय विद्यार्थिनींनी शाळेतील मुलांना व शाळेतील सर्व शिक्षकांना राख्या बांधून अतूट नाते धाग्याचे हा संदेश दिला.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री.मोरखंडे आर.आर,प्रा.पदवीधर श्री. कांबळे ई.के.श्री.गायकवाड एस.जी.श्री.गायकवाड एस.आर. सोमवंशी व्ही.एम. श्रीमती गिरी मॅडम, लांडगे मॅडम,यांच्यासह शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.रक्षा बंधनाच्या कार्यक्रमामुळे शाळेतील सर्व विध्यार्थी आनंदी झाले होते.
0 Comments