भाजपाचे बाळासाहेब पाटोदे यांनी असंख्य कार्यकर्त्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात जाहीर प्रवेश करणार
उदगीर : येथील भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष तथा पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य युवा नेते बाळासाहेब पाटोदे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत.
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील, खा. सुप्रिया सुळे, खा. अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत उदगीर येथे शिवस्वराज्य यात्रा येणार आहे. या कार्यक्रमात मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीत माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेब पाटोदे हे आपल्या असंख्य सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार आहेत.
बाळासाहेब पाटोदे हे एक युवा नेतृत्व असून त्यांचे उदगीर शहरात कार्यकर्त्यांचे मोठे संघटन आहे. मराठा समाजातील एक दमदार नेतृत्व म्हणून बाळासाहेब पाटोदे परिचित असून त्यांचा आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला होणार आहे.
आगामी काळात आपण माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार असून आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार यांचे विचार तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी काम करणार असल्याचे बाळासाहेब पाटोदे यांनी सांगितले.
0 Comments