Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

नांदेड जिल्ह्यात कारने जाणारा १ लाख ६६ हजार २०८ रुपयांचा गुटखा उदगिरात पकडला..

नांदेड जिल्ह्यात कारने जाणारा १ लाख ६६ हजार २०८ रुपयांचा गुटखा उदगिरात पकडला..

उदगीर ग्रामीण पोलीसांनी केला गुटखा व कार जप्त; दोघांविरुध्द गुन्हा

उदगीर : प्रतिनिधी
कर्नाटक राज्यातून उदगीर मार्गाने नांदेड जिल्ह्यात जाणारा १ लाख ६६ हजार २०८ रुपयांचा गुटखा व स्विफ्ट डिझायर कार उदगीर शहरातील बिदर रोड कमानी जवळ पकडला. याप्रकरणी सोमवारी (१२ ऑगस्ट) पहाटे चारच्या सुमारास उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     याबाबत अधिक माहिती अशी की, दि.११ ऑगस्ट रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास शहरातील बिदर ते उदगीर जाणारे रोडवर कमानीजवळ एक गजग्या रंगाची मारुती सुझुकी शिफट डिझायर कंपनीची कार क्र.०४ एफ.आर.९०५५ जिची किंमत अंदाजे ३ लाख ५० हजार व महाराष्ट्र राज्या मध्ये विक्रीसाठी प्रतिबंधीत असलेला सुगंधीत पान मसाला व तंबाखुजन्य गुटखा १ लाख ६६ हजार २०८ रुपयांचा व कार असे एकुन ५ लाख १६ हजार २०८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीनी संगनमत करून  बेकायदेशीररित्या वाहतुक करुन, महाराष्ट्र राज्या मध्ये विक्रीसाठी प्रतिबंधीत असलेला सुगंधीत पान मसाला व तंबाखुजन्य गुटखा विक्रीसाठी जवळ बाळगुन अन्न सुरक्षा आयुक्त अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य मुंबई या लोकसेवकाने जनहितार्थ काढलेला आदेश अधिसुचना क्रं.आसुमाअ/४९६/७दिनांक.१८ जुलै २०२३ याची माहिती असुन सुध्दा त्याची अवज्ञा करून उल्लंघन केले व गुन्हा केला आहे.

    याप्रकरणी पोलीस हेडकाँस्टेबल राम विश्वंभर बनसोडे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं.४५२/२०२४ कलम १२३, २७४, २७५, २२३,भारतीय न्याय संहिता २०२३ नुसार माधव गणपती अभंगे, मारोती दिंगाबर अभंगे (दोघेही रा. मंगनाळी पो.पेढवडज ता.कंधार जि.नांदेड) यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुनिल भिसे हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

जाहिरात