Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

नळेगाव रोडवर गुटख्यासह ८६ हजार ८२९ रुपयांचा मुद्देमाल ग्रामीण पोलिसांनी पकडला

नळेगाव रोडवर गुटख्यासह ८६ हजार ८२९ रुपयांचा मुद्देमाल ग्रामीण पोलिसांनी पकडला

उदगीर/प्रतिनिधी
उदगीर:नळेगाव रोडवरील मानमोडी नदी जवळ मोटारसायकल वरून गुटख्याची वाहतूक करीत असताना ११ ऑगस्ट रोज रविवारी साडे नऊ वाजेच्या सुमारास उदगीर ग्रामीण पोलिसांनी गुटख्यासह ८६ हजार ८२९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपींवर दोन वाजता गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की नळेगाव रोडवरील मानमोडी नदीजवळ आरोपीने महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंध असलेल्या तंबाखू जन्य पान मसाला गुटख्याची दुचाकीवरून वाहतूक करीत असताना आढळून आला. आरोपींकडून ५१ हजार ८२९ रुपयांचा तंबाखूजन्य गुटखा व एम.एच १३ एपी ७७७६ क्रमांकाची जुनी वापरात असलेली हिरो होंडा कंपनीची स्प्लेडंर दुचाकी ज्याची किंमत ३५ हजार रुपये असा एकूण ८६ हजार ८२९ रुपयांचा मुद्देमाल ग्रामीण पोलिसांनी जप्त केला आहे, याप्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल राम विश्वभंर बनसोडे यांच्या फिर्यादी वरून आरोपी बालाजी संग्राम पाटील वय ३० वर्ष राहणार टाकळी ता. देवणी ह.मु.पोस्ते नगर एसटी कॉलनी उदगीर यांच्यावर उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरंन ४४८/२४ कलम १२३,२७४,२७५,२२३भारतीय न्याय संहिता २०२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक भिसे यांच्याकडे देण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments

जाहिरात