Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

उदगीर येथे जेष्ठ पत्रकार निरंजन टकले यांचे व्याख्यान.

उदगीर येथे जेष्ठ पत्रकार निरंजन टकले यांचे व्याख्यान.

उदगीर:लातूर जिल्ह्यातील वाटेगाव येथील न्यायाधीश लोया यांच्या मृत्यू संदर्भात शोध पत्रकारिता करुन गूढ उलगडणारे निर्भीड पत्रकार निरंजन टकले यांचे उदगीर येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. प्रयास चळवळीच्या माध्यमातून रघुकुल मंगल कार्यालय उदगीर येथे सदर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. इलेक्ट्रॉनिक इंजीनियर असलेले निरंजन टकले यांनी गेल्या तीन दशकांपासून पत्रकारिता केली आहे. कॅरॅवॅन, सीएनएन आयबीएन आणि द वीक या सारख्या विख्यात वृत्त संस्थांसाठी त्यांनी पत्रकारिता केलेली आहे. शोध पत्रकारितेत टकले यांचे काम एक मैलाचे दगड सिध्द झाले आहे. वर्तमानातील अनेक ज्वलंत विषयांवर अभ्यासपूर्ण विमोचन करण्यासाठी त्यांची ख्याती आहे.
“सत्याग्रह : माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आमचे सुरु .” या विषयावर उद्या रविवार दिनांक ०६/१०/२०२४ रोजी सायंकाळी ठिक ६:०० वाजता कार्यक्रम होणार आहे. प्रयास चळवळीच्या माध्यमातून सदर व्याख्यानाचा लाभ घेण्यासाठी आव्हान करण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments

जाहिरात