संविधान बदलाची दिशाभूल दूर करण्यासाठी गावोगावी भारताचे संविधानची प्रत वाटप
विश्वजीत गायकवाड फाउंडेशन मार्फत जनजागृती
उदगीर : डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बनविलेल्या संविधनामध्ये कोणालाही मूलभूत अधिकारात बदल करता येत नाही . काही व्यक्ती स्वार्थी हेतूने खोटा प्रचार करून घटना बदलणार असा अपप्रचार करून जनतेची दिशा भुल करत आहेत . आपले कायमस्वरूपी अधिकार कोणते आहेत ते का बदलता येत नाहीत याबाबत जनजागृती करण्याच्या हेतूने इंजीं.विश्वजीत अनिलकुमार गायकवाड फाउंडेशन मार्फत गावोगावी जाऊन याबाबत माहिती दिली जात आहे . जनतेला सत्य कळावे यासाठी प्रत्येक गावात भारतीय संविधानाची एक प्रत भेट देण्यात येत आहे . याचा शुभारंभ जळकोट तालुक्यातील उमरदरा येथील सरपंच बालाजी गुट्टे यांना भारतीय संविधान ही प्रत देऊन करण्यात आला .
सामान्य जनतेला मूळ घटना पाहायला मिळाली तर खूप आनंद होतो , प्रत्यक्षात याचे वाचन करण्यासाठी ते विकत घेणे सामान्य व्यक्तीला शक्य नसते . यामुळे धूर्त व्यक्ती भारतीय संविधान बाबत खोटी माहिती देऊन सामान्य जनतेची दिशाभूल करून स्वार्थ साधत असतो . खोट्या अपप्रचार पासून जनतेने सावध व्हावे आणि भारतीय संविधान मध्ये नेमके काय लिहिले आहे याबाबत माहिती व्हावी याच उद्देशाने गावोगावी संविधान प्रत देण्यात येत असल्याचे इंजी . विश्वजीत अनिलकुमार गायकवाड यांनी सांगितले.
आज आमच्या गावात संविधानाची प्रत इंजी. विश्वजीत अनिलकुमार गायकवाड यांनी भेट दिली . संविधानात नेमके काय काय आहे हे आम्हालाही प्रथमच समजले . आता आम्हाला कोणीही संविधनाबद्दल खोटी माहिती सांगून दिशाभूल करू शकणार नाही . प्रत्येक गावात संविधान प्रत असली पाहिजे . ईंजी. विश्वजीत अनिलकुमार गायकवाड फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम आहे . असे बालाजी रामराव गुट्टे यांनी सांगितले .
0 Comments